पुस्तके वाचण्याचे फायदे
२९ जून २०२६पुस्तके वाचणे ही केवळ एक चांगली सवय नसून, ती आपल्या वैयक्तिक विकासासाठी एक अमूल्य देणगी आहे. जेव्हा ...
सन १९९७ मध्ये वाचनाच्या प्रेमामुळे काही मित्रांनी एकत्र येऊन श्री मोरेश्वर सेवा संघाचे हे रोपटे लावले. यासाठी श्री. श्रीधर साठे, कै. श्री. अरविंद कट्टी श्री. सुशील जोशी, श्रीमती शैलजा टिल्लू, श्री. भा. य. करंबेळकर, श्री. शशिकांत काजरेकर यांनी पुढाकार घेतला. श्री. श्रीधर साठे यांच्यावरील विश्वासाने अनेक सुजाण नागरिक संस्थेचे आजीव सभासद झाले. ग्रंथालयासाठी अनेकांनी पुस्तकं देऊ केली. कै. श्री. मधू देसाई तसेच सुविद्या प्रसारक संघ यांनी जागा वापरायला दिली त्यामुळे संस्थेला स्थैर्य आलं. माननीय श्री. गोपाल शेट्टी (माजी आमदार, खासदार) यांच्या प्रयत्नाने ग्रंथालयाला स्वत:ची वास्तू मिळाली.